Skip to main content

Posts

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

                                     दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. आज, शुक्रवार शरद म्हणजेच कोजागरी पोर्णिमा आहे. कोजागरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच आपल्याला माहित असते. पण त्याबाबतची इतर माहिती घेणेही आवश्यक आहे. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते. या दिवशी नवान्न (नवीन पिकव...